मुंबई

भांडुपच्या आशियाना इंडरस्ट्रीज मध्ये आग

भांडुपच्या आशियाना इंडरस्ट्रीज मध्ये आग

भांडूप : भांडुप येथील सोनापूर परिसरातील आशियाना इंडस्ट्रीअल इस्टेट या चार मजली इमारतीत असलेल्या रेश्मा गारमेंट्समध्ये आज दुपारी ३ च्या सुमारास आग लागली. दुपारी या इंडस्ट्रियल इस्टेटचा वीजप्रवाह खंडित झाला होता. त्यानंतर वीज प्रवाह पुन्हा सुरळीत झाला असता अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रेश्मा गारमेंटमध्ये मोठा स्पार्क होऊन आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली. या गारमेंट मालकाने ही जागा भाड्याने घेतली असून आज भाड्याची मुदत संपल्यामुळे या गारमेंट्स शिफ्टिंग सुरू होतं. आगीच्या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसून लाखोंचा माल जाळून खाक झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button