Maharashtra Gov

‘तिच्यासाठी’ सरकारच्या या योजना

मुलींच्या शिक्षणासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बर्याच योजना काढल्या आहेत. काही मुलींमध्ये जिद्द असते शिकण्याची आणि नोकरी करण्याची पण आर्थिक पाठबळ नसल्यामुळे मुलींना शिक्षण घेणे जमत नाही. यासाठी बऱ्याच संस्था मुलींसाठी उपयुक्त योजना काढत आहेत. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारसुद्धा यात जातीने लक्ष घालत आहेत.
 
‘बेटी बचाओ, बेटी पढओ ‘ अभियान
 
राज्यातील १९ जिल्ह्यात ६ ऑगस्ट २०१८ ला ही योजना लागू केली आहे. मुलींना शिक्षण देऊन  सक्षम करणे हा मुख्य उद्देश या योजने मागे आहे.
 
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना
आर्थिक अडचणींमुळे मुलींचे शिक्षण थांबू नये म्हणून १ ऑगस्ट २०१७ पासून महिला आणि बालविकास महाराष्ट्र शासनातर्फे एक मुलगी असल्यास १८ वर्षे कालावधीसाठी ५० हजार रुपये व दोन मुली असल्यास प्रत्येकी २५,००० रुपये काही अटींवर व पालकांच्या आर्थिक क्षमतेवर ही मदत दिली जाते.
सी. ए स. आय. आर. इनोवेशन अवार्ड फॉर स्कूल चिल्ड्रेन
 
या मध्ये नववीपासून मुलींसाठी अनेक शिष्यवृत्ती आहेत यामध्ये रोजगार व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते शाळा किंवा कॉलेज करून मुली जॉबही करू शकतात. 

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button