शिक्षण
अखेर १५ फेब्रुवारी पासून महाविद्यालय चालू, पहिल्या वर्षीचा अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता !
मुंबई: उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी युजीसीशी चर्चा विश्लेषण करून दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ पासून महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल असे त्यांनी सांगितले. तीन दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी कुलगुरूंशी बैठक घेतली त्यात हा निर्णय घ्यायचे ठरले.
या निर्णयानुसार फक्त महाविद्यालये चालू होतील असेही सांगितले. महाविद्यालयांनी सुद्धा विध्यार्थ्यांच्या सोयीने कॉलेजेस आणि क्लास्सेस चालू करावे असेही सांगितले. online किवा offline क्लासेस घ्यायचे हे त्या त्या महाविद्यालयांनी ठरवावे असे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यावेळी विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक नाही. ७५% उपस्थिती या वर्षात काढण्यात आली असून ५०% वर आणली आहे. हा निर्णय हा युजीसीशी चर्चा करूनच घेतला आहे.
परीक्षांबाबत बोलताना त्यांनी असे सांगितले की, परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या सोयीनेच झाल्या पाहिजे. त्यामुळे महाविद्यालयांनी कोविड -१९ ची सुरक्षा पाळूनच निर्णय घेतले पाहिजे. महाविद्यालयांनी परिस्थिती बघून निर्णय घ्यावे. १५ फेब्रुवारी ते ५ मार्च हा पहिला टप्पा असेल. त्याचप्रमाणे पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम कमी होण्याची शक्यता आहे.