Farmers
पीक विम्यासंदर्भातील तक्रार निवारणाकरिता तालुका आणि जिल्हास्तरावर सुविधा केंद्र सुरु करावे – कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
प्रधानमंत्री पीक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. यावेळी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी उंबरठा उत्पादन काढताना जोखीमस्तर आणि परतावा याचे सूत्र बदलण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे असे सांगितले. त्याच बरोबर ‘पीक विम्यासंदर्भातील तक्रार निवारणाकरिता तालुका आणि जिल्हास्तरावर सुविधा केंद्र सुरु करावे. तेथे विमा कंपन्यांनी विमा प्रतिनिधी नेमून शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवाव्यात. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे’ असे आदेश कृषिमंत्रींनी दिले.
या बैठकीत कृषिमंत्र्यांसमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, आमदार सुरेश धस, पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी, यांच्यासह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.