Politicsराजकारण

एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय?: आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई: रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाली आणि राज्यात यावरून राजकारण सुरू झालं. भाजपनं हा थेट माध्यम स्वातंत्र्यावरच घाला असल्याचं म्हणत शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली. भाजपचे तब्बल ९ केंद्रीय मंत्री अर्णब गोस्वामी यांच्या बाजूने मैदानात उतरले असताना आज सकाळी शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामधून या मुद्द्यावरून भाजपवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शिवसेनेच्या भूमिकेवर आता भाजपकडून आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर दोन ट्वीट करून आशिष शेलार यांनी थेट शिवसेना, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना टार्गेट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये आशिष शेलार म्हणतात, ‘रोज अस्मितेची ढाल काढून त्यामागे लपणे तुम्ही आधी थांबवा! अन्वय नाईक यांना न्याय मिळायलाच हवा. पण एक मराठी कुटुंब उभं करून तुम्ही रिया चक्रवर्तीला का वाचवताय? एका मराठी कुटुंबाची ढाल करून ‘दिशा सालियन’बाबत बोलणाऱ्यांची तोंडं का बंद करताय? बात और भी निकलेगी.. त्यावेळी आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलेला तपास आणि संपूर्ण पोलीस दल यांना खोटे ठरवून आता एका ‘सिंह’ यांना ‘परमवीर’ का देताय? खरी नौटंकी तर हीच आहे. एका ‘युवराज’ला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटे ठरवताय? पत्रपंडित हो, अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागलेत?’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button