मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र ६० सोसायटीच्या योजनांमधील रहिवाश्याच्या प्रश्नांवर चर्चा करून घेण्यात आले निर्णय






मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र
६० सोसायटीच्या योजनांमधील रहिवाश्याच्या प्रश्नांवर चर्चा करून घेण्यात आले निर्णय
– खासदार रविंद्र वायकर यांच्या प्रयत्नांनी आरेमध्ये एस.आर.ए प्रश्नी ‘जनता दरबार’चे आयोजन
– महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून याचे आयोजन
– वर्सोवा, दिंडोशी, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी व अंधेरी भागातील सुमारे २००० झोपडीधारकांनी घेतला सहभाग
मुंबई :
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून तसेच खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सहाय्याने आयोजित एस.आर.ए ‘जनता दरबार’चा लोकसभा क्षेत्रातील सुमारे २००० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. यातील ६० सोसायटीच्या योजनांच्या रहिवाश्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
२७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या वर्सोवा, अंधेरी (पूर्व व पश्चिम), गोरेगाव (पूर्व व पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व व पश्चिम), दिंडोशी (पूर्व व पश्चिम), मालाड (पूर्व व पश्चिम) येथील झोपडपट्टी धारकांचा एस.आर.ए च्या माध्यामातून पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या शंकांचे समाधान करण्यासाठी रविवार १७ मे रोजी एस.आर.ए अधिकारी यांच्या उपस्थितीत आरे कॉलोनी येथे ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या सहकार्याने झोपडीधारकांचे जिवनमान उंचवण्यासाठी ह्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
या जनता दरबारात १) झोपडीधारकांची बायोमेट्रिक विषयक समस्यांचे निराकरण, २) प्रलंबित भाडे तक्रारी निकाली काढून भाडे प्रदान करणे, ३) झोपडीधारकांची पात्रता विषयी तक्रारींचे निवारण, ४) सदनिका वाटपाची प्रकरणे निकाली काढणे., ५) झोपडपट्टी पुनर्वसन योजनांची सद्यास्थितीची माहिती देणे व तक्रारींचे निवारण करणे, ६) महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि.पु) आधी १९७१ मधील कलम ३३ खालील कार्यवाही करणे आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आहे. तसेच उपस्थित जनतेच्या समस्या ऐकून ७ ते १५ दिवसात समस्या सोडवण्याच्या सूचना खासदार वायकर यांनी संबंधीत उपस्थित अधिकारी यांना दिल्या.
यात एस.आर.ए चे आर.बी.मिटकर (उपमुख्य अभियंता), वैशाली लंभाते (उपजिल्हाधिकारी), स्वप्नील तांगडे (सक्षम अधिकारी), सचिन गिरी (सक्षम अधिकारी), प्रशांत सूर्यवंशी (सक्षम अधिकारी), राजाराम पाटील (सक्षम अधिकारी),, हनुमंत मासाळ (सक्षम अधिकारी),, दिनेश महाजन (सक्षम अधिकारी), स्वप्ना देशपांडे (मिळकत व्यवस्थापक), संध्या बावनकुळे (सहाय्यक निबंधक (सहकार) पूर्व व पश्चिम उपनगरे), विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर, उपविभाग प्रमुख दिलीप शिंदे, माजी नागसेविका राजुल पटेल, रेखा रामवंशी, शाखाप्रमुख राजन राणे, बाळकृष्ण जोशी, जनार्दन चव्हाण, मनीषा वायकर, दीप्ती वायकर पोतनीस, प्राजक्ता वायकर महाले, राहुल महाले, मिलिंद कापडी उपस्थित होते.
