परीक्षांबाबत सरकारचे धोरण पळ काढू आणि वेळ काढू – आशिष शेलार
मुंबई :- पदवी परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या पदवी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका करताना सरकारला प्रश्न केला आहे की, पदवी परीक्षा रद्द केल्यात, मग व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांना वाऱ्यावर सोडले काय? एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचे काय? सर्व परीक्षांबाबत एकसंघ निर्णय घ्या.
आदी(त्य) घोषणा आणि मग होमवर्क.. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात.
वारंवार "परिक्षा रद्द" एवढेच जाहीर होतेय. पण ATKT असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय? निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढतेय (1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 19, 2020
परीक्षेच्या या वादात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व पर्यावरणमंत्री आदित्य यांची भूमिका महत्त्वाची आहे. याबाबत टोमणा मारताना शेलार यांनी – आदी (त्य) घोषणा आणि मग होमवर्क … म्हणून आता लपून-छपून बैठकी घ्याव्या लागतात. वारंवार ‘परीक्षा रद्द’ एवढेच जाहीर होते. पण, एटीकेटी असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय? निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्रं माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढते आहे.
पदवी परिक्षा रद्द मग व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे काय? तेही महाराष्ट्राचेच तरुण आहेत ना? मग त्यांना का वाऱ्यावर सोडताय? ATKT असलेल्यांशी सापत्न का वागताय ?
एकसंघ निर्णय घ्या..
या तर महाराष्ट्र सरकारच्या पळ काढू आणि वेळ काढू भूमिका! (2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 19, 2020

