Maharashtra GovPoliticsShivSenaमुंबईराजकारण

उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आम्ही तुमच्याकडे उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

देशभरासह राज्यात कोरोनाचे संकट आहे . उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यानेच कोरोना संकटावर मात करू शकतोय. पूर्ण सत्ता जेव्हा शिवसेनेची येईल, सेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, तेव्हाच स्वप्न पूर्ण होईल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनबाबतच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागल्याचेही राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button