Politicsराजकारण

७ नोव्हेंबरला निघणार ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’

पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी ७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषदेत दिली. मोर्चा पंढरपूरमधून ७ नोव्हेंबरला निघणार आहे. २० दिवस पायी चालत मोर्चा मंत्रालयावर धडक देईल.

सरकारला हा मोर्चा महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे. यापूर्वी तुळजापूरमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. २१ दिवस उलटून गेले तरीही सरकारकडून काहीही निर्णय घेण्यात आला नाही म्हणून ७ नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चा २० दिवस चालणार आहे. रोज २० ते २५ किलोमीटर चालणार आहे. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य सहभागी होणार आहे. पंमोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबई जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button