संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही : चंद्रकांत पाटील
मुंबई: उद्धव ठाकरे सत्यवादी आहेत म्हणून तर आम्हाला अपेक्षा आहे. परंतु त्यांना केवळ आपल्या खुर्चीची काळजी लागली आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “पूजा चव्हाण अत्महत्त्या प्रकरणी सोमवारच्या आत संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर विधानभवनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, संपूर्ण राज्यभर आंदोलनाचं रान उठवू,” असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी दिला.
महाविकास आघाडीतील सहा मंत्र्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असताना त्यांच्यावर कुठल्याही स्वरुपाची कारवाई होत नाही, असं ते म्हणाले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्या पतीवरील गुन्हा, मराठा आरक्षण या सर्व मुद्द्यांवरून सरकारवर टीका केली. सरकारला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत त्याशिवाय आम्ही अधिवेशन होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.
चित्र वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन चंद्रकांत पाटील यांनी सरकारला प्रश्न केला कि, चित्रा वाघ यांच्याबद्दल आताच का कारवाई केली जातेय? परंतु नेत्यांना अशाप्रकारे त्रास देऊन आम्ही घाबरणार नाही. आम्ही भाजपचे सर्व नेते वाघ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्या आमच्या वाघिणी आहेत, त्या घाबरणाऱ्या नाहीत असे ही त्यांनी सांगितले.

