महाराष्ट्र शासनाची ६ विकसनशील कामे ! प्रगती पथावर महाराष्ट्र!
सध्याच्या काळात जर काही सकारात्मक बघायचे असेल तर या वर्षीच्या काळात महाराष्ट्रात झालेली विकसनशील कामे आणि त्यांचा आढावा घेऊया. यंदा राज्य शासनाने राज्याच्या विकासासाठी बरीच कामे केली आहेत. महाराष्ट्र हा प्रगती पथावर चालत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. कोरोना परिस्थितीशी सामना करत महाराष्ट्र शासन हे महाराष्ट्राच्या विकासाची सुद्धा कामे करत आहे. मुंबई मेट्रो रेल्वे , प्राणीसंग्रहालय, सिंचन प्रकल्प हे त्यातले काही भाग आहेत.
अंधेरी दहिसर भागात मुंबई मेट्रो रेल्वे आणण्याचा प्रकल्प
रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. शासनाने कोविडच्या काळात सुद्धा महत्वाच्या विकासाच्या कामांना तेवढेच महत्व दिले जेवढे नागरिकांच्या आरोग्याला दिले. कोविड प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे शहर कुलूपबंद आहे, तरीही राज्य सरकारने मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना परवानगी दिली आहे. येणाऱ्या ४ महिन्याच्या कालावधीत लवकरच हे नागरिकांसाठी खुले होणार आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अंधेरीतील १३ लाख रहिवाश्यांना याचा फायदा होणार आहे. रेल्वेच्या भाराला कमी करणे हा मुख्य हेतू राज्य शासनाचा आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे म्हणतात की, शासनाने कुठलेही विकासाचे काम थांबवलेले नाही तर नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी वेगाने कामे चालू आहेत.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय
नागपूरमध्ये राज्य वन विभाग आणि वन विकास महामंडळाने हे उद्यान विकसित केले आहे. हे 1,914 हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेले आहे आणि त्यात वन्यजीव अभयारण्य, भारतीय सफारी, आफ्रिकन सफारी जैवविविधता उद्यान आणि रात्री सफारीचा समावेश आहे. नागपूर शहरातील संस्कृती हे प्राणीसंगाहालय दाखवेल तर विदर्भात यामुळे रोजगानिर्मिती करणे हा मुख्य हेतू आहे.
बृहन्मुंबई हेरीटेज वॉक
नागरिकांचा आणि पर्यटकांमध्ये मुंबईचा वारसा वाढवण्याच्या प्रयत्नात राज्य सरकारने १२8 वर्ष जुन्या बीएमसी इमारतीमध्ये मार्गदर्शित हेरिटेज वॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसी इमारत ही युनेस्कोची जागतिक वारसा स्थळ आहे, जी 1893 मध्ये गोल्डन बेज बेसाल्ट खडकांसह व्हिक्टोरियन गॉथिक पुनरुज्जीवन शैलीमध्ये बांधली गेली. मुंबईचा भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीचा वारसा पर्यटकांना दाखवण्यासाठी हा वॉक आहे.
कृषिपंप वीजजोडणी योजना
कृषी पंपाना वीज जोडणीचा नवा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे.यात सोलर उर्जेतून वीजनिर्मिती करण्याचा सरकारचा उपक्रम असेल. सरकार महाराष्ट्रात 1,00,000 नग तैनात करण्याचे लक्ष्य आहे. विजेच्याबिलात शेतकर्यांना सूट लावी असे यामागचे उद्धेश आहेत. कृषी उर्जा अभियान, सौरऊर्जा प्रकल्प बँक अश्या उपाययोजना आणल्या आहेत.
“बेस्ट साठी आधुनिक सुविधा”
महाराष्ट्र शासन हे बेस्ट साठी नवनवीन उपक्रम हे आणतच असतात. या वेळेस एक आधुनिक ‘कंट्रोल रूम’ वडाळा डेपो च्या इथे बांधण्याचा उपक्रम आहे. परिवहन प्रशासनास बसमधील जागांचा मागोवा घेण्यात मदत करते आणि आत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे वाहनांच्या आत होत असलेल्या क्रियांवर नजर ठेवते.बेस्ट ट्रॅव्हल ॲप हेही महाराष्ट्र राज्य सरकारने काढले आहे
सायबर पोलीस स्टेशन
सायबर पोलीस स्टेशन हे सरकार लवकरच आणणार आहेत. राज्यात वाढत असणाऱ्या सायबर क्राईम मुळे राज्य सरकारने ही पाउले उचलली आहेत.९४ पोलीस स्टेशन काढण्याचा उपक्रम आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकार हे कायम पुढे आहे हा याचा हेतू आहे.
