महाराष्ट्रात कोरोनाच्या लशींचा साठा जातोय वाया !
मुंबई: राज्यात जवळजवळ ४.३ टक्के लसींचा साठा वाया जात असल्याचे समोर आले आहे. पहिलेच लसीकरण हे टप्प्याटप्प्याने चालू आहे दुसरीकडे लसी घ्यायला लोक शाशंक आहेत आणि आता लसीचा साठा वाया जाण्याची बातमी समोर येत आहे. मर्यादित स्वरूपात सुरु असलेले लसीकरण आणि एका कुपीत अधिक मात्रा असल्याने लस ही वाया जात आहे. साधारणपणे, १० टक्के साठा वाया जाण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात सध्या २ लसींचा वापर करण्यात येत आहे पहिली कोविशील्ड आणि दुसरी कोव्हीवॅक्सीन आणि एका कुपीत ०. ५ मिलिलिटरच्या दहा मात्रा तर कोव्हीवॅक्सिन मध्ये २० मात्रा असतात. या लसीचा एक असा नियम असतो की एक कुपी उघल्यानंतर साधारणतः चार ते पाच तासात तिचा वापर करणे आवश्यक असते अन्यथा ती वाया जाण्याची शक्यता असते.
लसीकरणाचा पहिला टप्पा हा आरोग्य कर्मचाऱ्यांवर होता आणि फ्रंटलाईन वर्कर यांच्यासाठी होता. सुरुवातीला आरोग्य कर्मचारीच शाशंक असल्याने लसीकरणाचा टक्का हा खाली होता मग हळू हळू आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपली हिम्मत दाखवत लसीकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी होते त्यांचेही प्रमाण कमी होते आणि आता हा जो न वापरलेला साठा आहे तो वाया जात आहे.
यामध्ये जी कोवशील्ड ची लस आहे त्याला तुलनेने मागणी जास्त आहे. त्यामुळे ही लस जास्त वाया जात नाही. पण कोव्हीवॅक्सीन ला प्रतिसाद कमी आहे. तसेच या लसीच्या एका कुपीत २० मात्रा असल्याने ती वाया जाते अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण थोडे कमी आहे. मुंबई पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी अशी माहिती दिली की, मुंबईत लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण हे कमी आहे. लस वाया जाऊ नये म्हणून तश्या केंद्राला सूचना दिल्या आल्यात. राज्यात साधारणतः ४.३ टक्के लस वाया जात असून मुंबईतील प्रमाण हे तुलनेने कमी आहे.