Sportsक्रिकेटक्रीडा

चेन्नईतील पराभवाने अख्ख समीकरण बदललं; भारताला टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठायची असेल तर…

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागंलं. या पराभवासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल स्थान गमावलं. गुणतालिकेत टीम इंडिंयाची पहिल्या स्थानावरुन चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडनं गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे.

इंग्लंडविरुद्धची पहिला कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने गमावला आहे. पण तरीही भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळू शकेल. जर इंग्लंडविरुद्धच्या सुरु असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका भारत 2-1 किंवा 3-1 ने जिंकली तर भारताचं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचं तिकीट पक्क असेल.

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताने एकच सामना गमावल्यास आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडेल. याचाच अर्थ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित तीन कसोटी सामन्यांपैकी कमीतकमी दोन कसोटी सामने जिंकून आणि एक ड्रॉ करावा लागणार आहे.

दुसरीकडे इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात जायचे असेल तर त्यांना भारताविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 3-0, 3-1 किंवा 4-0 अशी जिंकावी लागणार आहे. म्हणजे इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले पाहिजेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचं तिकिट मिळवण्यासाठी भारत आणि इंग्लंड मालिकेवर ऑस्ट्रेलियाचंही लक्ष आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 1-1 किंवा 2-2 अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button