स्वाभिमानी’च्या इशाऱ्यानंतर पालकमंत्री घेणार उद्या ऊस दराबाबत बैठक
कोल्हापूर: यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला किती दर द्यावा, यासाठी उद्या सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोमवारी ऑनलाईन ऊस परिषद होणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यापूर्वीच तडजोडीचा पायंडा मोडून काढला. आपला. कारखाना सुरू ठेवला आहे, पालकमंत्री सतेज पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने विचारणा केली. यानंतर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक परिषदा या ऑनलाईन घेतल्या जात आहेत. परिषदेच्या परवानगीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यात आज चर्चा झाली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार ऊस परिषद आता २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर होण्याऐवजी आता कल्पवृक्ष गार्डन हॉल येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या २ नोव्हेंबरला जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानावर ऊस परिषद घेण्याचे नियोजन केले होते. त्याबाबतची तयारीदेखील जवळपास पूर्ण झाली होती. मात्र, कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या परिषदेसाठी परवानगी दिली नव्हती. त्यांनतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं. या चर्चेनंतर परिषद ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री सतेज पाटील आज भेट घेतली. ऊस साखर कारखाने सुरु करण्याआधी उसाच दर निश्चित करावा, अशी मागणी केली. यावेळी, श्री पाटील यांनी साखर कारखान्यांच्या अध्यक्षांशी संवाद साधून उद्याची बैठक निश्चित आहे.
