Maharashtra Govक्राईम न्यूजपिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad)

कोरोना काळात नियम उल्लंघनाचा आकडा ५९, ८०० खटल्यांच्या वर !

पिंपरी : मार्च पासून कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर या काळात कठीण कारवाई केली. त्यांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर भारतीय दंडविधान कलम १८८ अन्वये अंतर्गत खटले दाखल करण्यात आले. तब्बल ५९,८०० खटले हे दाखल करून गुन्हेही दाखल झाले. पण हेच गुन्हे मागे घेण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे.

कलम १८८ या कायद्या अंतर्गत जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन असे नियम लागू होतात.या कायद्या अंतर्गत पोलिसांनी जे नागरिक नियम तोडत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. यातील बहुतांश नागरिकांनी दंडाची रक्कम भरली. पण बहुतांश जणांनी हा दंड भरला नाही. तर राज्यशासनाने असा निर्णय घेतला की हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी दंड भरला नाही आहे त्यांना दिलासा मिळणार आहे.

लॉक डाऊन च्या काळात शहरात मोठ्या संख्येने अवैध धंदे सुरु होते. गावठी दारू, जुगार, अमली पदार्थांची तस्करी असे प्रकार सुरु होते. या गोष्टींसाठी काही लोक एकत्र येऊन समूहसंसर्गचा धोका वाढवत होते. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई केली. पिंपरी चिंचवड मधील पोलीस आयुक्त सुधीर हिरमेठ यांनी असे व्यक्तव्य केले की, याबाबतीत अद्यापही अधिकृत आदेश प्राप्त झाला नाही. याबाबतीत आदेश आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button