मुंबई

टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ – आशिष शेलारांची नालेसफाईवरून महापालिकेवर टीका

मुंबई: भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून महापालिकेवर निशाणा साधला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे, असे शेलार यांनी अनेक प्रश्न केले आहेत.

महापालिका आयुक्तांनी नालेसफाई बाबत केलेल्या दाव्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून, त्यात नालेसफाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा ‘डोंगर’ उभा केला जातो. आयुक्त मोठमोठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात सगळे दावे वाहून जातात. नव्या आयुक्तांनी यावर्षी ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ वर्षानुवर्षे सुरू आहे, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button