आजही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे तीन तास महत्त्वाचे; सतर्कतेचा इशारा
मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागात आजसुद्धा काही प्रमाणात असेल असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.
आज 4 जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांत विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्यामने दिला आहे.
निसर्ग वादळादरम्यान मुंबई-पुण्यासह अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडल्याच्या आणि इमारतीचं छत, पत्रे उडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं. या चक्रीवादळाचा मुंबईचा धोका टळला असला तरीही मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आणि अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. या वादळात दोन जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत.
निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये रात्री आणि गुरुवारी सकाळी पावसानं झोडपलं आहे. ठाणे आणि उपगरांमध्ये गुरुवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत रिमझिम पाऊस आहे. दरम्यान आज मुंबईसह, ठाणे, उपनगर, कोकण, नाशिक, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

