मुंबईशिक्षण

आधी घोषणा, मग गृहपाठ.. असे का झाले?, आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विचारणा

मुंबई : सध्या अंतिम वर्षांच्या परीक्षेवरून सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गूण देऊन पुढच्या वर्षाला पाठवण्याचा सरकारचा निर्णय झाला होता. मात्र सरकारच्या या निर्णयाचा भाजपच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला होता.

दरम्यान, काल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत परीक्षांचा मुद्दा उपस्थित करून, परीक्षांसाठी देशभरात एकच सूत्र हवं. अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.

आपण मागे पडतोय,अन्याय होतोय,ही भावना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल,याची काळजी करुन मा. मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे परिक्षांबाबत सल्लामसलत केली. आम्ही जे प्रश्न उपस्थितीत केले होते त्यातून मांडलेली हीच “पालकत्वाची” काळजी अखेर मुख्यमंत्र्यांच्या ध्यानात आली.

आता गाडी रुळावर येऊ लागलेय तरी प्रश्न उरतोच…निर्णय कधी होणार? ATKT असलेल्या 40% विद्यार्थ्यांचे काय करणार? आधी घोषणा, मग गृहपाठ.. असे का झाले? घोषणा करण्यासाठी सत्ताबाह्य कुठल्या युवा संघटनेचा दबाव होता का?

सरकारच्या लक्षात असू द्या..महाराष्ट्रातील सुमारे दहा लाख विद्यार्थीच्या आयुष्याला हे टोचलंय!!, असे म्हणत शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button