महाराष्ट्रातील लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर
गडचिरोली: महाराष्ट्र हा लोककलेचा आगर म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राची लावणी, दशावतारी नाटके, वारली समाज, भजने, गीते असे कित्येक प्रकार प्रसिद्ध आहेत. हे कलाकार निरक्षर आहेत पण त्यांचा अनुभव त्यांना साक्षर माणसापेक्षा ज्ञानी बनवतो. या लोकांची बुद्धी आणि स्मरणशक्ती एवढी चांगली असते कि ते शेकडो गीते, भजने कागदावर न लिहता त्यांना तोंडपाठ असतात. पण सध्या ह्या कला नामशेष होत आहेत. अनेक लोककलांचे शेवटचे अवशेष उरले आहे. त्याच पैकी आहेत देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर गावच्या बहुरूपी समाजातील तुरा मंडळाची हि लोककला.

देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर गावात बहुतांश घरे हि बहुरूपी समाजाची आहेत. हे लोक यांच्या परंपरेनुसार विदुषक, हनुमान यांची रूपे घेऊन लोकांचे मनोरंजन करायचे आणि पोट भरायचे पण गावकरी हे त्यांची निंदा करायला लागले. भिक मागतात, आश्रीतासारखे वागतात, फुकट पैसे मागतात या लोक निन्देमुळे त्यांनी वेगळा पर्याय म्हणून लोकगीते सादर करण्याचा निर्धार केला. या लोक गीतांमुळे त्यांना शिघ्रगीते गाण्याची सवय लागली. त्यामुळे कागदावर न लिहीतासुद्धा ते गाऊ शकतात.
![]()
हरिदास विठोबा सुतार, ज्ञानेश्वर विठोबा सुतार, भगवान श्रावण तांदुळकर, गंगाधर नारायण माहुरे, आलादास दिना सहारे यांनी लोकागीते गाण्याचा प्रारंभ केला. व नागपूरचे हरी पाटील टीमकी वाले यांच्या फडात उमेदवारी केली. व नंतर तुरा मंडळ सुरु केले पण सध्या कोरोनाच्या काळात त्यांना बऱ्याच हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. आरोग्य प्रबोधिनीचे डॉक्टर. सूर्यप्रकाश गाभाने सारख्या व्यक्ती यांना मदत करतात पण बाकीचे नागरिक स्व:ताहून या लोकांना मदत करायला तयार नाहीत. त्यामुळे हि त्यांची कला लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
आजकालचे लोक अश्लील गाण्यांना प्रतिसात देतात पण आम्हाला लोकागीते, लोककला पुढे चालवणार्यांना प्रोत्साहन देत नाहीत अशी खंत हे कलाकार व्यक्त करतात. येणारी पिढी सुद्धा या यावजी दुसर्या व्यवसायांना प्राधान्य देत आहे आणि आपल्या कलेला पुढे नेण्यासाठी कोणीच नाही अशी भीती त्यांनी प्रकट केली आहे.
