लाइफस्टाइललाईफस्टाईललेख

या ५ गोष्टींनी तुम्ही कामाच्या ठिकाणी होणारे वाद टाळू शकतात!

लॉक डाऊन नंतर आता बरीच ऑफिसेस चालू झाली आहेत. कोणी नवीन नोकरीच्या शोधात आहे तर कोणी जुन्याच कामात अडकला आहे. बरेच दिवस घरात राहिल्याने एक गोष्ट ऑफिस मध्ये वाढली आहे ती, कामाचा तणाव आणि त्यातून होणारी भांडणे. घरच्यांना सांभाळता येऊ शकते पण ऑफिसमध्ये वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या विचारांना सांभाळावे लागते. त्यामुळे जो त्रागा होतो तो वेगळाच. पण सामंजस्याने तुम्ही हा होणार त्रास टाळू शकता. ते बोलतात ना ‘ Don’t fear conflict; embrace it- it’s your job’.

१. भावनात्मक होऊ नका
ऑफिसेस आणि कंपनी मध्ये तुम्हाला बरेच असें लोक, बॉस आणि कर्मचारी भेटतील जे तुम्हाला टोचून बोलणारे असतील तसेच नाव ठेवणारे असतील. त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. एका कानाने ऐका आणि दुसर्या कानाने सोडून द्या या म्हणी प्रमाणे वागा. एवढे मनात पक्के करा कि भांडणे, वादविवाद हे होणारच आहेत आणि त्या विचाराने कामा करा. आणि जरी न टाळणारे वाद आलेच तर तुम्ही तुमची बाजू सामंजस्याने मांडा तसेच समोरच्याचे सुद्धा ऐकून घ्या.

२. संवाद चांगला ठेवा
आपल्याला प्रत्येकाशी जुळवून घेता येईलच असे नाही पण आपण आपला संवाद हा त्या माणसाची चांगला ठेऊ शकतो. हा माणूस वाईटच आहे असे ठरवू नका. प्रथमतः त्याच्याशी बोला आणि मग ठरावा कि या माणसाशी कसे वागायचे ते. जेणेकरून जरी स्वभाव नाही आवडला तरी कामापुरता संवाद हा नक्कीच राहील.

३. निर्णय ठाम ठेवा
बर्याचदा आपल्या हातात एखादे काम दिलेले असते. त्याचे आपण लीडर असतो. अशावेळी स्वतःचे निर्णय ठाम ठेवा. कारण निर्णय डळमळीत झाल्याने कामावर परिणाम होऊन वाद होऊ शकतात.

४. सहकार्यांची मदत घ्या
जर एखादे काम जमत नसेल तर सहकार्यांची मदत घ्या जेणेकरून काम हलके होईल व कामाचा ताणताणाव येणार नाही. एखाद्याची मदत घेतल्याने काही कमी पणा येत नाही एवढे लक्षात ठेवा.

५. वाद विवादातून शिका
वादविवादातून सुद्धा बरच शिकायला मिळते. चुका समजतात. वेगवेगळे दृष्टीकोन कळतात आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे समजूतदारपणा वाढतो. त्यामुळे ऑफिस मधल्या वादविवादांपासून पाठ न फिरवता त्यांना सामोरे जाऊन त्यातून शिकण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button