कोल्हापूरशिक्षण

दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30 टक्के : यंदाही मुलींची बाजी

कोल्हापूर : दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर बुधवारी सकाळी झाला . राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा औरंगाबाद विभागाचा आहे. औरंगाबादचा निकाल हा 92 टक्के इतका लागला. तसेच नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

उद्या गुरुवारपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. गुण पडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर छायाप्रतींसाठी 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.

*विभागनिहाय टक्केवारी*

  • कोकण – 98.77 टक्के
  • पुणे – 97.34 टक्के
  • कोल्हापूर – 97.64 टक्के
  • मुंबई – 96.72 टक्के
  • अमरावती – 95.14 टक्के
  • नागपूर – 93.84 टक्के
  • नाशिक – 93.73 टक्के
  • लातूर – 93.09 टक्के
  • औरंगाबाद – 92 टक्के

या ऑनलाइन वेबसाइट्सवर निकाल उपलब्ध
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com www.mahahsscboard.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button