Corona UpdatesMaharashtra Govमुंबई

वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण !

 
मुंबई: रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने संध्याकाळी ७ वाजता ते राज्याला संबोधित करणार असल्याचे जाहीर केले. हा संदेश टेलिव्हिजनवर प्रसारित होताच, मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये ट्विट, फेसबुक पोस्ट्स, व्हॉट्सअ‍ॅप संदेशांवर सर्व आश्चर्यचकित झाले की, कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटीची शक्यता आहे की काय.
 
त्यानंतर संध्याकाळी झालेल्या भाषणात लोकांना मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसाची मुदत दिली आणि खबरदारी घ्यायला सांगितले. या नंतर लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले. 10 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढायला सुरवात झाली. 1 ते 9 फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्रात दिवसाला सरासरी 2,489 प्रकरणे नोंदली गेली. याच कालावधीत, सक्रिय प्रकरणे 43,701 वरून 34,640 वर घसरली. परंतु 10 फेब्रुवारीपासून संक्रमणाची संख्या केवळ वाढली आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात 59,937 नवीन कोरोनाबाधित रुग्ण मिळाले आहेत, ज्यात दररोज सरासरी 4,610 प्रकरणे आढळली आहेत. सक्रिय प्रकरणे वाढून 53,113 वर गेली आहेत. 11 दिवसांत तब्बल 22,848 प्रकरणे नोंदली गेली आहेत.
 
अमरावतीमध्ये लॉकडाउन करण्यात आले. काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावली गेली आहे. मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत असल्याने मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल पुन्हा बंद होईल का या विचाराने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. लोकल बंद होऊ नयेत, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. आवाहन करून लोक ऐकत नसतील तर कारवाई होईल. हॉटेल, नाइट क्लबवर कारवाई सुरू आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पुन्हा पसरले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button