Politicsराजकारण

जंगलराज आणताय का महाराष्ट्रात? एनसीबी अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर आशिष शेलार यांचा टोमणा

मुंबई: गोरेगावमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्याच्या पथकावर रविवारी ड्रग्ज तस्करांनी हल्ला केला. तीन जणांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्रात जंगलराज आणताय का? असा टोमणा भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला मारला.

गोरेगावमध्ये एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यासाठी एनसीबीचं पथक गेले होते.आशिष शेलार यांनी ट्विट केले – “मुंबईत ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला. ड्रग्ज रँकेट उघडे पडू नये म्हणून असे हल्ले कोण घडवून आणते आहे ? कुणाला सत्य समोर येईल याची भीती वाटते आहे? हे हल्लेखोर कोण? त्यांचे रक्षक कोण? अधिकाऱ्यांवर हल्ले करुन जंगलराज आणताय का महाराष्ट्रात?”

ड्रग्ज तस्कर कैरी मेंडिस नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथक गेले होते. पाच लोकांचे पथक होत. हल्ल्यानंतर कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button