विधान परिषद
‘नालेसफाईचे २०० कोटी कोणाच्या खिशात’ – विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबई पाण्याखाली जायची वेळ आली या परिस्थितीला राज्य सरकार आणि संबंधित महापालिकांचा कारभार जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला. मुंबईत यंदा नालेसफाईच्या कामांसाठी खर्च केलेले २०० कोटी रुपये कोणाचे खिशात गेले, असा सवालही मुंडे यांनी यावेळी केला.