Monsoonऔरंगाबाद (संभाजी नगर) - Aurangabad
जालना जिल्ह्यातल्या धामण धरणाला तडे
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलेले असताना जालना जिल्ह्यातल्या धामण धरणाला तडे जाऊन त्यातून पाणी बाहेर पाझरत आहे. या धरणा लगत असलेल्या ४ ते ५ गावांना मोठा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. धामण धरणात सध्या ९०% इतका पाणीसाठा असून गेल्या पाच वर्षात प्रथमच धरणात एवढा पाणीसाठा जमा झाला. ९०% पाणीसाठ्याचा आनंद असतानाच धरणाच्या भिंतीच्या तड्यानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.