वांद्र्यात इमारत कोसळून १६ जण जखमी, आशिष शेलारांनी केली मदतीची मागणी
मुंबई : ऐन पावसाळ्यात वांद्रे पश्चिम येथील रिझवी इंजिनिअर कॉलेज शेजारी शेरलो राजन मार्गावर एक रिकामी इमारत बाजूच्या निवासी इमारतीवर कोसळून १६ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलेले आहे. बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मध्यरात्रीपासून आतापर्यंत ढिगारा उपसण्याचं काम युद्ध स्तरावर सुरुच आहे.
कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याचा ढिगारा उपसण्यासाठी सध्या ५ जेसीबी, ५ डंपर मागवण्यात आले आहेत. या दुर्घटनेत १६ जण जखमी झाले. त्यापैकी २ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना रात्रीच यश आले. जखमींवर लीलावती आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत आज कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या व दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी. @MhatreViru pic.twitter.com/Zq5DgbcBHB
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 17, 2020
दरम्यान, या घटनेनंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्वीट करत मदतीची मागणी केली आहे. माझ्या मतदार संघातील खार येथील कल्पना ही इमारत कोसळून दुर्घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल, महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. मीही तातडीने जाऊन पाहणी केली. बचाव कार्य अद्याप सुरु असून नुकसान झालेल्या आणि दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

