MonsoonRatnagiri

तिवरे धरणफुटीबाबत एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे जलसंपदामंत्रींचे आदेश

तिवरे येथे धरण फुटून 23 जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर ‘या घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ज्यांची घरे वाहून गेली आहेत, त्यांना चार महिन्यांच्या आत घरे बांधून दिली जातील.’, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

दोन – तीन दिवस सातत्याने सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्री तिवरे धरण फुटून मृत्युची संख्या २३ असून काही जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. या दुर्घटनेतील जीवितहानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दु:ख व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button