मुंबई

बेपत्ता दिव्यांशच्या पालकांचे पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन

बेपत्ता असलेल्या दिव्यांशचे शोधकार्य सलग पाचव्या दिवशी देखील सुरु आहेच. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी त्याच्या पालकांनी रविवारी पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन केले. रविवारी देखील सकाळपासून गल्लीबोळातील गटारांपासून दहा किलोमीटरपर्यंतच्या नाल्यापर्यंत शोधकार्य हाती घेण्यात आले. मात्र दिव्यांशचा काहीच शोध लागला नाही.

दरम्यान या घटनेनंतर या परिसरात संतापाचे वातावरण असून दिव्यांशचे कुटुंबीय आणि येथील स्थानिकांनी रविवारी दिंडोशी पोलिस ठाण्यात आंदोलन केले. या घटनेसाठी पालिका अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गुन्हा दाखल केल्याशिवाय येथून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलन करणाऱ्यांनी घेतल्यामुळे पोलिस उपायुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी दिंडोशी पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आंदोलन करणाऱ्यांची समजूत काढली. उद्यापर्यंत गुन्हा दाखल न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button