मुंबई

चीनसोबतच्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद

चीनने पुन्हा एकदा भारताच्या हद्दीत घुसण्याचे धाडस केले आहे. एवढेच नाही तर, सीमेवरील तणावासंदर्भात चर्चा सुरू असातानाच चीनने भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. या झडपेत आधी भारताचे तीन जवान मारले गेल्याची बातमी होती.

आज सकाळी भारत -चीन सीमेवरील हिंसक झडपेत कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, जवान पलानी, कुंदन ओझा यांना वीरमरण आल्याचं समोर आलं होतं. चीनच्या या हल्ल्यात एकूण 20 जवान जखमी झाले होते. त्यापैकी 3 जवान सुरुवातीला शहीद झाले होते, मात्र आता लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताचे 20 जवान शहीदशहीद झाले आहेत.

दरम्यान, एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button