जळगाव (Jalgaon)

जळगावच्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये पाणी घुसले

मुंबई : कोरोना व्हायरस संपूर्ण महाराष्ट्र पिचून गेला असताना राज्यात मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्याला जबर फटका बसला असून प्रचंड नुकसान झाले आहे. तर काल रविवारी जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पावसाचे पाणी आत शिरले. यामुळे या पूर्ण रुग्णालयात पाणीच पाणी झाले. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, या रुग्णालयात पाणी शिरल्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 7-8 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

रविवारी (14 जून) ला महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातं पावसाने दमदार हजेरी लावली. कोकणच्या रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या औरंगाबाद आणि विदर्भच्या गोंदिया जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला. या मुसळधार पावसाचा जोर इतका होता की जळगावच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पावसाचे पाणी शिरले.या रुग्णालयात पुराप्रमाणे पाणी वाहत होते. मात्र येथील कर्मचा-यांनी रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले. या पावसामुळे या रुग्णालयाचे प्रचंड नुकसाना झाले आहे. या रुग्णालयात पुराप्रमाणे पाणी वाहत होते.

मात्र येथील कर्मचा-यांनी रुग्णालयातील रुग्णांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवले. या पावसामुळे या रुग्णालयाचे प्रचंड नुकसाना झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button