BJPMaharashtra Govमुंबई

कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांच्या सोईंबाबत त्वरित निर्णय घ्या – आशिष शेलार

मुंबई : गौरी – गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईकरांच्या पासबाबत व त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्याच्या सोईंबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन भाजपाचे  आमदार आशिष शेलार  यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

पत्रात म्हटले आहे की, कोकणातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी मुंबई येथून येणाऱ्या पाव्हण्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेऊन, तपासणीनंतर निरोगी लोकांना गावात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. विलगीकरणाच्या सोईंसाठी ग्रामपंचायतींकडे आवश्यक सोई व निधी नाही. शासनाने यासाठी ग्राम पंचायतींना सोई – निधी उपलब्ध करून दिला नाही. त्याबाबत विचारही केला नाही.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही? लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासीयांचीही राज्य सरकार ताटातूट करणार?

सरकार कधी निर्णय घोषित करणार? ई-पास कधी पासून उपलब्ध होणार? कोरंटाईन करणार कि अँटीबॉडी टेस्ट करणार?

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button