Maharashtra Govनागपूर

नागपुरात 25, 26 जुलै दोन दिवस जनता कर्फ्यू

नागपूर : नागपुरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असताना पाहून नागपूर पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल तसेच कडक लॉकडाऊन लावण्यात येईल असा इशारा नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे  यांनी दिला होता. त्यातून मधला मार्ग काढत आता शनिवार 25 जुलै व रविवार 26 जुलै हे दोन दिवस जनता कर्फ्यू 

लावण्यात येणार आहे.नागपुरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि लोक नियम पाळत नसल्याने अधिका-यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नागपुरात पून्हा कडक लॉकडाऊन करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी विरोध दर्शवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही असे सुचवले होते. त्यानंतर आज याबाबत महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांची बैठक झाली. या बैठकीत लॉकडाऊन बाबत सविस्तर चर्चा झाली. त्यात सध्या दोन दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याचे ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button