MonsoonRatnagiri

चिपळुणमधील तिवरे धरणाला तडा, ६ जणांचा मृत्यु

चार दिवस सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणमधील तिवरे धरणाला तडा जावून ते फुटले. या घटनेत धरणालगतच्या गावात पाणी घुसून ७ जणांचा मृत्यु झाला. तर अद्याप १९ जण बेपत्ता आहेत. मंगळवारी रात्री धरणाला तडा गेल्याचे समजले असता तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. परंतु तासाभरातच धरण फुटून आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरले.

शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांनी या घटनास्थळी भेट दिली. ‘मागील चार-सहा महिन्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला याची माहिती दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी काम करताना निष्काळजीपणा केला. स्थानिकांनी सांगूनही दुर्लक्ष केले गेले त्यामुळे या घटनेला जबाबदार प्रशासन आहे’ असा आरोप आमदार सदानंद चव्हाण यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button