Politicsराजकारणसोशल मीडिया

सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार? – भाजपाचे आशिष शेलार यांचा सरकारला टोमणा

मुंबई : नोएडाजवळ एक हजार एकर जागेत चित्रनगरी उभारू, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपाचे आशिष शेलार यांचा सरकारला टोमणाकेली. तेव्हापासून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार बॉलिवूड मुंबईतून पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी ओरड करते आहे. त्याचवेळी नाणार आणि बुलेट ट्रेन सारख्या मोठ्या प्रकल्पना मात्र विरोध करते! यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला टोमणा मारला – सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काल मुंबईला आले होते. काही उद्योजकांसोबत चित्रपट सृष्टीतील काही कलाकार- निर्मात्यांना भेटले. यावरूनही महाआघाडी सरकारमधील घटकांनी टीका केली. याला योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले, मी कोणाचे काढून घेण्याकरिता किवा हिसकावून घेण्यासाठी मुंबईत आलो नाही. स्पर्धेच्या युगात चांगल्या सुविधा मिळतात त्याला गुंतवणूकदार पसंती देतात. सरकारचे स्थैर्य, पोषक वातावरण महत्वाचे असते. उगाचच चिंता कशाला करता!

फिल्म सिटीवरून सुरु असलेल्या राजकारणादरम्यान राज्य सरकारची कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक तर ठरणार नाही ना? असा प्रश्न भाजपा नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. त्यांनी ट्विट केले, सततच्या विरोधामुळे जैतापूर आणि नाणार होणार की जाणार?, बुलेट ट्रेनलाही विरोधाचा ब्रेक, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र परराज्यात गेले. अशी कार्यपद्धती फिल्म सिटीला मारक नाही ना ठरणार? महाराष्ट्राचे नुकसान करु नका!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button