Maharashtra Gov

अ‌ॅमेझॉन आणि रिलायन्स सारख्या कंपन्यांचा शेतक-यांना उपयोग होणार नाही – शरद पवार

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या ओला दुष्काळ पाहणी दौ-यावर आहेत. परतीच्या पावसाने शेतक-यांना रडवून सोडले आहे. हाती आलेले पिक पाण्यात गेले. यामुले शेतकरी हवालदिल झाला आहे, खचला आहे. त्यांना धीर देण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी शरद पवार शेतक-यांच्या भेटी घेत आहेत.
उस्मानाबाद, तुळजापुरच्या दौ-यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कृषी विशयक कायद्याविवर भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे मोठ्या कंपन्या बाजारपेठेत उतरतील. या कंपन्या शेतीमाल विकत घेणाऱ्या इतर प्रतिस्पर्ध्यांना संपवून टाकतील. यानंतर आपल्याला मिळेल त्या भावाने या कंपन्यांना शेतमाल विकावा लागेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचेपवार म्हणाले.

ते म्हणाले, अमेझॉन ही जगातील मोठी कंपनी आहे. तर रिलायन्सदेखील भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कृषी कायद्यांमुळे शेतकरी या कंपन्यांना थेट माल विकू शकतील. या कंपन्या आता शेतकऱ्यांना सांगेल तो भाव देतील. ते बाजारपेठेतील इतर प्रतिस्पर्ध्यांना संपवतील. यानंतर या कंपन्या सांगतील त्या भावाने आपल्याला शेतमाल विकावा लागेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटते. काही दिवसांपूर्वी शेतमालाचा हमीभाव कायम राहील, असे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी कायद्यातच स्पष्टपणे तशी तरतूद करावी, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला.

मनमोहन सिंह सरकारच्या काळात रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी भाजपने देशातील लहान दुकानदारांना एकत्र करुन आंदोलन केले होते. याचा भाजपला आता विसर पडला असेल, अशी खोचक टिप्पणीही शरद पवार यांनी केली. अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी शरद पवार यांनी  केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत. राज्य सरकारने जास्तीत जास्त कर्ज काढावे, असेही पवार यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button