कोरोना अपडेट : गेल्या २४ तासात ४,७८७ कोरोनाबाधित !
मुंबई: राज्यात कोरोना हा पून्हा वर येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ४,७८७ कोरोनाबाधित आढळले असून ही एका दिवसातली उच्चांकी रुग्ण वाढ आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागु करण्याचा विचार राज्य पातळीवर सुरु आहे.
मुंबई , पुणे, ठाण्यासह नागपूर आणि अमरावतीतील रुग्णांमध्ये वाढ झाली. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ७६ हजार ९३ वर पोहचली आहे. आतापर्यंत १९ लाख ८५ हजार २६१ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील ॲक्टिव्ह केसेसची संख्या ३८ हजार १३ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६३१ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी हे वृत्त दिलं आहे.
राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, समारंभ साधेपणाने साजरे करणे आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. निर्बंध शिथिल करताना लागू असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा आदेशही त्यांनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.
