Environmentकोल्हापूर

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा यंदा राज्यात प्रथम

राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड उपक्रमात आतापर्यंत झालेल्या वृक्षलागवडीत कोल्हापूर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यांनतर दुसर्‍या क्रमांकावर चंद्रपूर व तिसर्‍या क्रमांकांवर नाशिक जिल्हा आहे.

राज्य शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्याला भौगोलिक आकारमान आणि पावसाचे प्रमाण यानुसार नियोजित उद्दिष्टे देण्यात आली होती. यात कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी 13 लाख 22 हजार 670 इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य होते त्यापैकी आतापर्यंत 72 लाख 77 हजार 906 इतके वृक्ष लावण्यात आले आहेत.

राज्यात सर्वाधिक उद्दिष्टे 1 कोटी 71 लाख इतके चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आले आहे. सर्वात कमी उद्दिष्ट 41 लाख 65 हजार 900 इतके सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत सर्वाधिक वृक्षलागवड 85 लाख 42 हजार 50 इतकी केली आहे. पण उद्दिष्टाच्या प्रमाणात हे प्रमाण 49.90 टक्के इतके आहे. तर कोल्हापूरचे उद्दिष्टानुसार प्रमाणाची टक्केवारी 64.28 इतकी चांगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button