जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
जन आशीर्वाद यात्रा हा साधारण चार हजार किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटक, युवाशक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न आदित्य करतील.
18 जुलै – जळगाव
19 जुलै – धुळे, मालेगाव
20 जुलै – नाशिक शहर
21 जुलै – नाशिक ग्रामीण, नगर
22 जुलै – नगर, श्रीरामपूर, शिर्डी
आदित्य ठाकरे म्हणाले की, “लोकसभा निडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नव्हते, मला त्यांची मनं जिंकायची आहेत. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी प्रत्येकाला सोबत घेऊन काम करावे लागणार आहे.”
“मी कोणतेही पद मिळवण्यासाठी ही यात्रा आयोजित केलेली नाही. महा काहीतरी बनायचं आहे म्हणून ही यात्रा काढलेली नाही. मला महाराष्ट्र घडवायचा आहे. कोणतीही तारीख, कोणताही मुहूर्त न पाहता मी आजपासून बालेकिल्ल्यातून सुरुवात करतोय, कारण मला प्रत्येक नागरिकाचे आभार मानायचे आहेत.” – आदित्य ठाकरे

