बृहन्मुंबई महानगरपालिका - BMCमुंबई

दिव्यांशला न्याय देण्यासाठी स्थानिकांचा पालिकेवर आक्रोश मोर्चा

तीन दिवसापूर्वी मुंबईतील गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या विटभट्टी शेजारील झोपडपट्टीतील उघड्या गटारीमध्ये पडलेला दिड वर्षीय दिव्यांश सिंह नावाचा बालक तीन दिवसांच्या शोध कार्यानंतरही सापडत नसल्याने, त्याविरोधात संतप्त नागरिकांनी शनिवारी पालिका पी. दक्षिण कार्यालयावर आक्रोश मार्चा काढून आपला संताप व्यक्त केला. दिव्यांशला शोधण्यासाठी अग्निशमन, पालिका कर्मचारी आणि एनडीआरएफ टीम शोध कार्य करत होती. परंतु त्याचा मृतदेह शोधण्यास या तिन्ही यंत्रणाना सापडत नसल्याने हा मोर्चा काढावा लागल्याची माहिती संतप्त नागरिकांनी यावेळी दिली. तसेच पालिकेच्या हलगर्जीपणामुळेच दिव्यांशचा जीव गेला, असा आरोपही यावेळी नागरिकांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button