Monsoon
‘शिवसेना आणि भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून दरवर्षी मुंबई पाण्यात जाते’ – आमदार जितेंद्र आव्हाड
मुंबईत गेल्या ३ – ४ दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसानी मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर पैसे खात असल्याचा आरॊप केला. ‘शिवसेना आणि भाजप नाल्यातून पैसे खाते, म्हणून दरवर्षी मुंबई पाण्यात जाते’, अशा शब्दांत आव्हाड यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र केले. नालेसफाईच्या कामासाठी आधी टेंडर काढावे लागते. त्यानंतर हे काम मे महिन्यापर्यंत संपवावे लागते. मात्र, हे काम मे महिन्याच्या अखेरीस सुरू केलं जातं आणि जूनच्या सुरुवातीला अर्धवटच सोडून दिलं जातं. वर्षानुवर्षे तेच कंत्राटदार असतात, असं म्हणत आव्हाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका केली.