Politicsराजकारण

महाराष्ट्रात काय दिवे लावले? देवेंद्र फडणवीसांनी घेतला ठाकरे सरकारचा समाचार

मुंबई : कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या ? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, रशिया, अमेरिकेत काय झालं ते बोलता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात.तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं. पण वास्तवात एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही, असे फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारने या अधिवेशनात दहा विधेयक दाखवली आहेत. त्यांना मूळात चर्चाच करायची नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा-ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये, यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ काढतेय, असा आरोपही फडणवीस यांनी केला .

“राज्य सरकारने या अधिवेशनात दहा विधेयक दाखवली आहेत. त्यांना मूळात चर्चाच करायची नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा-ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये, यासाठी हे सरकार चर्चेपासून पळ काढतेय” असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आजपासून राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पूर आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी विरोधी पक्षांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

करोना काळात सरकारी बंगल्यांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, “बंगल्यांच्या नूतनीकरणाची कामे सुरु असतात. बंगल्यांच्या नूतनीकरणावरील खर्च कमीत कमी पैशात झाला पाहिजे. पण शेतकऱ्यांना सुद्धा मदत करा. या सरकारकडे बंगल्यांवर खर्च करायला पैसा आहे, मग शेतकऱ्यांना द्यायला पैसा का नाही?” असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

काही बंगल्यांची पाणीपट्टी थकलीय, त्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, तो पीडब्ल्यूडीच्या अख्त्यारीतील विषय आहे. PWD ने योग्य ती माहिती घेऊन, योग्य ती कारवाई करावी.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या व न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या ? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, रशिया, अमेरिकेत काय झालं ते बोलता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात.” “तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन २५ ते ५० हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं. पण वास्तवात एक फुटकी कवडी सुद्धा दिली नाही” असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button