पुणे
१२ वर्षानंतर देखील आरोपींची शिक्षा टांगणीवर
पुणे – २००७ साली पुण्यातील गहूंजे येथील बीपीओ महिला कर्मचारीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली. तसेच पुढील निर्देश येईपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले. १० एप्रिल २०१९ ला पुणे जिल्हा न्यायालाय आणि सत्र न्यायालयाने आरोपी पुरूषोत्तम बोराटे आणि प्रदिप कोकडे यांना २४ जून २०१९ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र त्यांनी ही शिक्षा फेटाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे अनेक याचिका केल्या. बोराटे आणि कोकडे यांनी केलेल्या या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारल्या व त्यांची २४ जून २०१९ रोजी ची फाशी रद्द करण्यात आली आहे.

