Farmersसोलापूर

‘आमचा शेतकरी सहजासहजी हार मानणारा नाही’ – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

सोलापूर जिल्ह्य़ात मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथे आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ‘शेतकऱ्यांनी अडचणीच्या काळात फक्त शिवसेनेला हाक द्यावी त्यांच्या मदतीला शिवसेना आल्याशिवाय राहणार नाही’, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी दुष्काळासह आणखी कितीही संकटे आली तरी शेतकरी हिंमतीने परिस्थितीशी सामना करतो. आमचा शेतकरी सहजासहजी हार मानणारा नाही. परंतु अलीकडे प्रश्नच एवढे वाढले आहेत की त्यामुळे शेतकरी स्वत:चे बरे-वाईट करून घेत आहेत. हा मार्ग चुकीचा आहे. असे म्हणत आत्महत्येस बळी जाऊ नये असा संदेश दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button