आता गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं’, पंकजा मुंडे संतापल्या
बीड : दसऱ्याच्या दिवशी अनेक ठिकाणी नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मेळावे घेण्यात आले. मात्र, भगवान गडावर घेतलेले ऑनलाईन भाषण पंकजा मुंडेंवर भारती पडले आहे. त्यांच्यासह गर्दी झाल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावर पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी परवानगी घेऊन गेले असता गुन्हा दाखल झाले. कार्यकर्त्यांनंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव इथल्या भगवान भक्ती गडावर घेतलेल्या मेळाव्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यानंतर पंकजा मुंडे यांनी याबाब त ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. “गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे,” असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
पंकजा मुंडे यांनी सावरगाव घाट इथे ऑनलाईन दसरा मेळावा घेतला होता. परंतु अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये ४० ते ५० जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, खासदार भागवत कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या लोकांनी कोणतंही सोशल डिस्टन्स पाळलं नाही. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन त्यांनी केले नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे.
याबाबत पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, ‘मी अतिवृष्टीची पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असतां गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं आहे’.
“अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
