AgriculturalFarmersMaharashtra Gov

राज्यातील शेतकर्यांना पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज!

मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे . राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. शेतकर्यांना पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत ३ लाखापर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होणार आहे. या मुळे ज्या शेतकर्यांना कर्ज माफी झाली नाही अशा शेतकर्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे.

राज्य सरकार आणि कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत याचा निर्णय घेण्याचा निश्चित झाला. या बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे, बाळासाहेब पाटील हे उपस्थित होते. तसेच कृषी विषय संदर्भात विविध योजनाचे सुद्धा चर्चा विश्लेषण करण्यात आले. पेरणी हंगाम आणि शेतकऱ्यांच्या अडचणी या गोष्टी लक्षात घेऊन शेतकर्यांना वेळीच कर्जपुरवठा होणे अत्यंत आवश्यक असते त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे समजते.

पंजाबराव देशमुख या योजने अंतर्गत पहिले १ लाख पर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळायचे आणि ३ लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर जास्तीत जास्त २ टक्के व्याज लावत असत. पण यंदा त्या योजनेत बदल करून ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय देण्यात आला. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक घेऊन पुढचे निर्णय घेण्यात येतील असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. राजधानीत शेतकरी आंदोलन चालू असताना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय फायद्याचाच ठरेल अशी शेतकऱ्यांमध्ये आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button