३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा यंदा राज्यात प्रथम
राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड उपक्रमात आतापर्यंत झालेल्या वृक्षलागवडीत कोल्हापूर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे. त्यांनतर दुसर्या क्रमांकावर चंद्रपूर व तिसर्या क्रमांकांवर नाशिक जिल्हा आहे.
राज्य शासनाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्याला भौगोलिक आकारमान आणि पावसाचे प्रमाण यानुसार नियोजित उद्दिष्टे देण्यात आली होती. यात कोल्हापूर जिल्ह्यासाठी 1 कोटी 13 लाख 22 हजार 670 इतके वृक्षलागवडीचे उद्दिष्ट्य होते त्यापैकी आतापर्यंत 72 लाख 77 हजार 906 इतके वृक्ष लावण्यात आले आहेत.
राज्यात सर्वाधिक उद्दिष्टे 1 कोटी 71 लाख इतके चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आले आहे. सर्वात कमी उद्दिष्ट 41 लाख 65 हजार 900 इतके सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. 1 जुलैपासून आतापर्यंत सर्वाधिक वृक्षलागवड 85 लाख 42 हजार 50 इतकी केली आहे. पण उद्दिष्टाच्या प्रमाणात हे प्रमाण 49.90 टक्के इतके आहे. तर कोल्हापूरचे उद्दिष्टानुसार प्रमाणाची टक्केवारी 64.28 इतकी चांगली आहे.