Monsoonनाशिक

त्र्यंबकेश्वर मंदिराचे तलावात रूपांतर

त्र्यंबकेश्वरात दोन दिवसांत दीडशे मिलिमीटर पाऊस पडल्याने त्र्यंबकेश्वर संकटात आहे. मंदिराच्या आवारामधे पाण्याचे तलाव झाल्याने वास्तूरचनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकनगरीत येतात. पण, आता हे मंदिर पाण्याखाली जाईल की काय, अशी भीती आहे. कारण ब्रह्मगिरीवरुन येणारे पाणी थेट मंदिरात शिरू लागले आहे. पुढच्या श्रावण महिन्यात ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू होईल. त्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी मोठा धोका निर्माण झाला आहे. हे सगळं मोठ्या प्रमाणात झालेल्या काँक्रिटीकरणामुळे घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button