राजकारण

महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का? – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर सुमारे महिनाभर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण? यावर चर्चा सुरु होती. आता मात्र प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली असून शिवसेनेने या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीतील पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही २५ मे रोजी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून मागील दीड महिना राज्यातील प्रदेशाध्यक्ष पद रिक्त होते. आता मात्र बाळासाहेब थोरात यांची निवड झाली असली तरी काँग्रेसवर होणारे टीकास्त्र थांबल्याचे चित्र काही दिसत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button