मुंबई पोलिसांना कुणी काम करू दिलं नाही ? ; आशिष शेलारांचा अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा
मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देताच भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला .
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले .
"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!" "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे.
पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही?
कुणी त्यांना ठरवू दिले नाही?
कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020
शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , ‘पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. हा ‘सिंघम’चा डायलॉग शंभर टक्के खरा आहे. पण सुशांतसिंह रजपूतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही? कुणी त्यांना ठरवू दिले नाही? कुणी त्यांना त्यांच्या नावलौकिक आणि ख्यातीप्रमाणे काम करू दिले नाही? मुंबई पोलिसांना कुणी बोलू दिले नाही? पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात, पण सुशांतच्या प्रकरणात अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का? सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला. या प्रकरणी आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती शेलार यांनी केली आहे.
कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही?
पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?
सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला.याप्रकरणी
आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020


