Sportsक्रिकेटक्रीडा

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या रॅंकिंगमध्ये मोठी झेप

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चेन्नई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा ३१७ धावांनी पराभूत करत परतफेड केली आहे. या विजयासाह भारतीय संघानं आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्याक्रमांकावर झेप घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतायी संघ चौथ्या स्थानावर घसरला होता. पण पराभवाची परतफेड करत भारतीय संघानं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपंल आव्हानं जिवंत ठेवलं आहे. दुसऱ्या कसोटीत पराभावाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ पहिल्या स्थानावरुन चौथ्या क्रमांकावर घरसला आहे.

चेन्नई येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार न्यूझीलंडचा संघ प्रथम स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाची विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघाची विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९.२ आहे.

आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतलं अव्वल दोन संघामध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर फायनल सामना होणार आहेत. चेन्नई कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं ट्विट करत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचण्याची काही समीकरणं सांगितली आहेत. आयसीसीनं सांगितलेल्या समिकरणानुसार भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ अद्याप कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळू शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button